कतृत्व, नेतृत्व व दातृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे सुनिल सस्ते.
२९ मे वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.... जीवनाची सुरूवात व जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस म्हणजे वाढदिवस...२९ मे वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.... जीवनाची सुरूवात व जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस म्हणजे वाढदिवस...
कतृत्व, नेतृत्व व दातृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे सुनिल सस्ते.
२९ मे वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव….
जीवनाची सुरूवात व जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस म्हणजे वाढदिवस… असाच बारामती येथील गेली पाच टर्म विरोधातून निवडून येणारे एकमेव विरोधी पक्ष नेते सुनिल दादासोा सस्ते यांचा २९ मे वाढदिवसानिमित्त प्रथमत: मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
सुनिल सस्ते नगरसेवक जरी असले तरी तळागाळातील, जनसामान्यांच्या मनातील जनसेवक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. प्रत्येक संदेश नाते फुलवणारा व नात्यातले प्रेम द्विगुणीत करणारा असतो. ज्याच्या अंगी कतृत्व, नेतृत्व व दातृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे सुनिल सस्ते आहेत. नगरपरिषदेत त्यांनी पाऊल टाकले आणि सचोटी, मेहनत, विश्र्वास, तत्परतेने सर्वसामान्य नागरीकांची मने जिंकली आणि नागरीकांच्या गळ्यातील ताईत सुनिल सस्ते होऊन बसले आहेत.
प्रत्येकाच्या सुख-दु:खात धावणारे सुनिल सस्ते आहेत. कळताच क्षणी त्याठिकाणी भेट देणे, समोरच्या व्यक्तीला धीर देणे, येणार्या अडचणींना दूर करणे या वृत्तीमुळे त्यांचा नावलौकीक वाढतच चाललेला आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी नागरीकांची केलेली सेवा वाखण्याजोगी आहे. त्यांच्या अंगी संयम आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे ते धनी ठरलेले आहेत. त्यांनी जीवनात उपदेश देण्यापेक्षा कृती करून जनमत कमाविले आहे.
कित्येक वेळा त्यांनी नागरीकांच्या कल्याणासाठी, विकासासाठी विरोधकाची तलवार म्यानात ठेवली आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन काळात सुनिल सस्तेंनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंना उत्तर प्रदेश येथे चौदा जण अडकून पडल्याचे सांगताच, सुप्रिया सुळेंनी तातडीने या चौदा जणांना बारामतीत सुखरूप आणले. संकट समयी राजकारण बाजुला ठेवून कार्य करणारे सुनिल सस्ते आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण एखाद्या प्रकरणात माफी मागून झालेली चुक सुधारू शकतो, पण माफी मागुन तुटलेला विश्र्वास कधीही मिळत नाही.
सुनिल सस्तें यांच्या डोक्यावर खूप मोठी शस्त्रक्रिया होऊन सुद्धा संकट समयी लॉकडाऊन काळात नागरीकांना सेवा देण्यामध्ये ते पुढे होते आज कित्येक जण भितीपोटी घरातून बाहेर पडले नाही परंतु, सुनिल सस्ते जोखीम पत्करून नागरीकांना सेवा देण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी जी नागरीकांना मदत केली त्याबाबत कुठेही फोटोसेशन, प्रसिद्धी न करता त्यांनी केलेले कार्य महत्वाचे आहे.
नागरीकांच्या हाकेला धावणारे नगरसेवक सुनिल सस्ते आहेत. ते ज्या प्रभागातून निवडून आले त्या प्रभागात तर नागरीकांना सेवा देतातच पण, त्यांच्या कामाचा झपाटा पाहता त्यांना इतर प्रभागातून नागरीक प्रश्र्न मांडतात ते प्रश्र्न सोडविण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये आहे. एवढा दांडगा जनसंपर्क त्यांचा आहे. या सर्व कामात त्यांचे पुतणे सागर (उर्फ धनु ) सस्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभते. बारामतीत काका-पुतण्याचे राजकारण, समाजकारण ज्याप्रमाणे सुप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे या सुनिल सस्ते व (सागर उर्फ) धनु सस्ते यांचे समाजकारण व राजकारण तेवढेच प्रसिद्ध आहे.
सुनिल सस्ते यांच्या सावलीप्रमाणे सतत बरोबर असणारे शाकीर बागवान यांनी कधीही साथ सोडली नाही. एवढे प्रेम शाकीर बागवान सुनिल सस्तें यांच्यावर करीत आलेले आहेत. नगरपरिषद सभागृहात साथ देणारे विष्णुपंत चौधर यांची साथ लाभत असते. कायम पाठीशी राहणारे मित्रांनी सोशल मिडीयावर शुभेच्छा देवून समक्ष येऊन शुभेच्छा देत असतात.सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, डॉक्टर, वकील, शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव करीत असतात.
सुनिल सस्ते यांच्या अंगी अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर असल्याने ते समाजात महान कार्य करीत आहेत. या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जाते व आजच्या आनंदाच्या क्षणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव दरवर्षी होत असतो यात शंका नाही.