कन्हेरी येथील तालुका फळ रोपवाटिकेस कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची भेट
कृषी सहायक यांच्यामार्फत योजनांबाबत सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहाचवावी.
कन्हेरी येथील तालुका फळ रोपवाटिकेस कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची भेट
कृषी सहायक यांच्यामार्फत योजनांबाबत सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहाचवावी.
बारामती वार्तापत्र
कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी कृषी विभागाच्या कन्हेरी येथील तालुका फळ रोपवाटिकेला शुक्रवारी (24 जानेवारी) भेट देवून पाहणी केली. रोपवाटिकेतील मातृवृक्ष लागवड, पाणी नियोजन, रोपे निर्मितीची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी पोखराचे प्रकल्प संचालक परमिल सिंग, कृषी आयुक्त रावसाहेब बागडे, व्यवस्थापकीय संचालक सुनिल महेंद्रकर, प्रकल्प संचालक स्मार्ट व कृषी उपसचिव डॉ. हेमंत वसेकर, संतोष कराड, प्रफुल्ल ठाकूर, अण्णा चंदनशिवे, प्रतिभा पाटील, एन.एच.एम संचालक किसन मुळे, आत्माचे संचालक अशोक किरनाळी, विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नायकवडी, प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटी, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक सुनील बोरकर, उदय देशमुख, ठाण्याचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, पुणे विभागीय कृषी सहसंचालक, दत्तात्रेय गवसाणी, ठाणे वि.कृ.स.स. अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, एन.एच.एम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पल्लवी देवरे, सुप्रिया बांदल आदी उपस्थित होते.
प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले, शेतकऱ्यांना रोप निर्मिती, रोप लागवड करणे, विविध छाटणी, निगा राखणे याबाबत प्रशिक्षण आयोजित करावे, रोपवाटिकेद्वारे दर्जेदार रोपे निर्मिती करण्याबाबतही मार्गदर्शन केले.
बारामती तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती घेतली, या योजनांचा अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावनिहाय व्हॉट्सॲप ग्रुप तयार करावे. कृषी सहायक यांच्यामार्फत योजनांबाबत सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहाचवावी.
कृषी विज्ञान केंद्रालाही भेट श्री. रस्तोगी यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे भेट देवून येथील नवनवीन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांनी सर्व क्षेत्राची माहिती दिली.
मौजे पिंपळी येथे ऊस पाचट व्यवस्थापन श्री. प्रशांत देवकाते यांच्या उस क्षेत्रालाही भेट देवून माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे अग्रिस्टॅकयोजना अमंलबजावणीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत पिंपळी येथ आढावा घेवून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी यांनी तालुका फळ रोपवाटिका कान्हेरी प्रक्षेत्रावरील सर्व विकास कामांची तसेच मातृवृक्ष लागवड, नफा-तोटा पत्रक, रोपेनिर्मिती, तालुका फळ रोपवाटिकावरील विकास कामे, सुविधा बाबतची माहिती यांनी दिली.