स्थानिक

कमलनयन बजाज कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, कॉलेजच्या विद्याथिनींचे रेड हॅट आयोजित परीक्षेमध्ये यश संपादन

विद्या प्रतिष्ठान संस्थेमार्फत कु. पूजा चव्हाण हिचे विशेष कौतुक

कमलनयन बजाज कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, कॉलेजच्या विद्याथिनींचे रेड हॅट आयोजित परीक्षेमध्ये यश संपादन 

विद्या प्रतिष्ठान संस्थेमार्फत कु. पूजा चव्हाण हिचे विशेष कौतुक

बारामती वार्तापत्र

बारामती या शहरातील नामाकिंत विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयामधील विद्याथिनींने रेड हॅट या आंतरराष्ट्रीय कंपनीने आयोजित “आरएच आयटी बुद्धिमता चाचणी २०२१” राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले. रेड हॅट ह्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे आशिया आणि पॅसिफिक विभागाचे प्रमुख श्री. शिरीषकुमार पांडे यांनी तिचे कौतुक केले व ग्रामीण भागातील या विद्याथिनींने मिळविलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केले. तिने मिळविलेल्या ह्या यशाबद्दल रेड हॅट कंपनीद्वारे ऍपल कंपनीचे आयपॅड भेट म्हणून देण्यात आला.

या निमित्त सदरील महाविद्यालयामध्ये तिचा सत्कार समारंभ दिनांक ३०/१०/२०२१ रोजी आयोजित करण्यात आला होता. वरील कार्यक्रमासाठी श्रीमती कविता पाटील, टॉप आयटी,पुणे या रेड हॅट कंपनीतर्फे कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते तिला भेट वितरित करण्यात आली. श्रीमती कविता पाटील यांनी पूजा चव्हाण हिचे रेड हॅट सर्टिफिकेशन साठी संपूर्ण आर्थिक सहाय्य व लागणारे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. या आधुनिक युगात कॉम्पुटरचा वापर खूप मोठा प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे रेड हॅट लिनक्स या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. हे तंत्रज्ञान इंजिनिअरिंग शिवाय ईतर महाविद्यालयातील आर्ट्स, कॉमर्स व सायन्स इत्यादी विध्यार्थ्यांना देखील आत्मसात करावे असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी केले.

विद्या प्रतिष्ठान संस्थेमार्फत कु. पूजा चव्हाण हिचे विशेष कौतुक करण्यात आले. तिने मनोगत व्यक्त करताना आयोजित परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रा.प्रदिप पैठणे व इतर प्राध्यापकांनी यांनी वेळोवेळी मनोबल उंचावले आणि सतत पाठिंबा दिल्या बद्दल आभार मानले.

महाविद्यालयामध्ये रेड हॅट हे सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रा.प्रदिप पैठणे यांनी २०१९ या साली सुरु करून अनेक विद्यार्थ्यांसाठी रेड हॅट या विषयात प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या कोर्से नंतर नोकरीच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत. डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. सुधीर लांडे, डॉ. सी. स. कुळकर्णी (विभागप्रमुख कॉम्पुटर इंजिनीरिंग),डॉ.शीतल टकले (विभागप्रमुख,माहिती तंत्रज्ञान ),डॉ.संताजी शिंदे ,डॉ. दि.भ. हंचाटे, डॉ. राजवीर शास्री व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. श्री. मुकेश रंगदाळ यांनी आभार व्यक्त केले. श्री.वैभव भोसले आणि श्री.मंगेश खंडाळे यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Back to top button