करमाळा पोलीस घेणार मनोहर मामांचा ताबा
या जामीन अर्जावर एडवोकेट रुपाली ठोंबरे, एडवोकेट हेमंत नरूटे यांनी आरोपी मनोहर भोसले याच्या वतीने बाजू मांडली. सरकारी पक्षाचा व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी मनोहर भोसले याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर करमाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली.

बारामती वार्तापत्र
कॅन्सरवर उपचार करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मनोहरमामा तथा मनोहर भोसले याला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आज बारामतीच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर करमाळा पोलिसांनी त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. तर या प्रकरणात फरार असलेल्या ओंकार शिंदे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बारामती शहरातील कसबा येथील शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सर हा आजार झाला होता. आपण संत बाळूमामाचे अवतार असल्याचे सांगत मनोहर भोसले यांनी कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने २ लाख ५१ हजार रुपये घेतले. याबद्दल शशिकांत खरात यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनोहरमामासह ओंकार शिंदे आणि विशाल वाघमारे यांच्यावर फसवणूक आणि जादू टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
बारामती तालुका पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी मनोहरमामाला अटक केली होती. तब्बल नऊ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर मनोहरमामाला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील ओंकार शिंदे यालाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.