करोनासाठी 80 हजार कोटी केंद्राकडे आहेत का?
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
करोनासाठी 80 हजार कोटी केंद्राकडे आहेत का?
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
पुणे – बारामती वार्तापत्र
करोनावरील लस सर्व भारतीयांना देण्यासाठी पुढील वर्षभरात केंद्र सरकारला 80 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. याची जाणीव सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी करून दिली आहे. त्यांनी आपले ट्विट पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.
महत्त्वाचा प्रश्न : भारत सरकारकडे पुढील वर्षभरात 80 हजार कोटी रुपये उपलब्ध होतील का? त्यामुळे देशातील प्रत्येकाला लस खरेदी आणि वितरित करता येईल. या आपल्यापुढील चिंता करायला लावणाऱ्या आव्हानाला तोंड द्यायचे आहे, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
करोनावरील संशोधनासाठी या कंपनीने जगातील अनेक मान्यवर कंपन्यांशी करार केले आहेत. त्यातील ऍस्ट्राझेनका ऑक्सफर्डनिर्मित लसीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. पुण्यात सध्या या लशीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू अहेत. ससून, भारती विद्यापीठाचे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात या चाचण्या सुरू आहेत.