कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज
जिल्हा - अहमदनगर नगरपंचायत - कर्जत निकाल- भाजप-2 राष्ट्रवादी- 12 काँग्रेस- 3
कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज
जिल्हा – अहमदनगर नगरपंचायत – कर्जत निकाल- भाजप-2 राष्ट्रवादी- 12 काँग्रेस- 3
नगर: प्रतिनिधी
राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे. तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंना कात्रजचा घाट दाखवत कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला 17 पैकी 12 जागा मिळाल्या असून भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जदारांनी पाहिली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. राज्यात बहुतांशी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.