कर्जाच्या ओझ्याखाली दबून बंद पडलेल्या ‘भीमा-पाटस’ कारखाना पुन्हा सुरू होणार;उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हा बँकेच्या कर्जाची एकरकमी परतफेड ते करणार आहेत.

कर्जाच्या ओझ्याखाली दबून बंद पडलेल्या ‘भीमा-पाटस’ कारखाना पुन्हा सुरू होणार;उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हा बँकेच्या कर्जाची एकरकमी परतफेड ते करणार आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते व आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी पवार यांनी कर्जाच्या ओझ्याखाली दबून बंद पडलेल्या ‘भीमा-पाटस’ कारखाना पुन्हा सुरू होण्याबाबतचे आशादायक विधान केले.
पवार म्हणाले, ”भीमा पाटस कारखाना परराज्यातील मोठ्या कारखानदाराला चालवायला देण्याबाबत आमच्या बैठका चालू आहेत. कारखान्यावरील जिल्हा बँकेच्या कर्जाची एकरकमी परतफेड ते करणार आहेत. त्यामुळे भीमा पाट्स कारखाना दुप्पट क्षमतेने सुरू होईल,” कर्जाच्या ओझ्याखाली दबून बंद पडलेल्या ‘भीमा-पाटस’ कारखाना पुन्हा सुरू होण्याबाबतचे आशादायक विधान पवार यांनी केले.
”दिगंबर दुर्गाडे यांच्याकडे भीमा पाटसवरील कर्जाची एकरकमी परतफेड संबंधित कारखानदार करत आहे. तो कर्नाटकात चार-पाच कारखान्यांवर रोज पासष्ट हजार टन ऊस गाळप करतोय. उद्या स्पर्धा असल्याने कारखाना दुप्पट होतोय. पण हेच आपल्यापैकी कुणी केले तर काहीजण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करतात,” अशी खंत अजितदादांनी व्यक्त केली.