क्राईम रिपोर्ट

कर्नाटकमध्ये पतीने केला पत्नीचा खून,नातेवाईकांनी केले पतीवर गंभीर आरोप

“हा केवळ खून नसून विश्वासघात आणि क्रूरतेचा कळस आहे,

कर्नाटकमध्ये पतीने केला पत्नीचा खून,नातेवाईकांनी केले पतीवर गंभीर आरोप

“हा केवळ खून नसून विश्वासघात आणि क्रूरतेचा कळस आहे,

बारामती वार्तापत्र 

कर्नाटकमध्ये घडलेली एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, चारित्र्यावर संशय घेत पतीनेच आपल्या विवाहित पत्नीचा निर्घृण खून केल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने आपल्या पत्नीला गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जाण्याचा बहाणा करत घराबाहेर नेले. सुरुवातीला ही साधी धार्मिक यात्रा असल्याचे भासवण्यात आले. मात्र, यामागे पतीचा वेगळाच कट असल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

गाणगापूरकडे जात असताना किंवा तेथे पोहोचल्यानंतर पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून केल्याचे समोर येत आहे.या घटनेनंतर मृत महिलेची आत्या तसेच आई-वडील यांनी बारामती मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करत पतीवर गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नातेवाईकांनी कर्नाटक पोलिसांकडे तक्रार दाखल करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हा केवळ खून नसून विश्वासघात आणि क्रूरतेचा कळस आहे,” असेही त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान,पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून आरोपीना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली

Back to top button