कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ बारामतीत पुतळ्यास दुग्ध अभिषेक घालून निषेध नोंदविण्यात आला.
कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने घोषणाबाजी करत तीव्र स्वरूपात निषेध

बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला आहे. यासाठी राज्यभर महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती शहारातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालादुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला तसेच या क्रूर घटनेच्या व कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने घोषणाबाजी करत तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बारामती युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ,राहुल कदम,तुषार लोखंडे नगरसेवक समीर चव्हाण,पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष साधू बल्लाळ,अतुल बालगुडे,संतोष जगताप, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सागर खलाटे,अभिजित ढवाण,चेतन काळे,अभिजित निगडे,तुषार सावंत, सुरज सावंत, कुणाल जाधव,नावेद शेख,निखिल चव्हाण, विशाल जाधव,महेश साळुंखे उपस्थित होते.