बारामती तालुक्यात पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी..
उंडवडी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेस घातला दुधाचा अभिषेक.

बारामती तालुक्यात पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी..
उंडवडी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेस घातला दुधाचा अभिषेक.
बारामती:-(प्रतिनिधी)
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल पंढरपूर या ठिकाणी वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले होते.
यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.काही ठिकाणी आमदार पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते तर काही ठिकाणी प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते.
राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी तर गोपीचंद पडळकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही दिला होता.
हे सर्व सुरू असतानाच बारामती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती.
यावेळी तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्यासह गोविंद देवकाते, अँड.ज्ञानेश्वर माने,जयराज बागल, विशाल कोकरे,प्रकाश मोरे,प्रमोद खराडे,भाऊसाहेब मोरे व इतर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.व आज उंडवडी येथे पडळकर यांचे समर्थन करत एकच छंद गोपीचंद अशा घोषणा देत त्यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घातला.या प्रकारानंतर सहा प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.