कर्मयोगी कारखाना बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी
२१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध

कर्मयोगी कारखाना बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी
२१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध
इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याची चर्चा संपूर्ण इंदापूर तालुक्यात होती. मंगळवारी (दि.१२) दुपार अखेर हे चित्र स्पष्ट झाले असून नेहमीप्रमाणेच या ही निवडणुकीत कारखाना बिनविरोध करण्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना यश आले आहे.
या निवडणुकीत दाखल असणारे अर्ज माघारी घेण्याचा मंगळवारी ( दि.१२ ) शेवटचा दिवस होता. या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यक्षेत्रातील सभासदांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध पार पडत असुन पुन्हा एकदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकारातील मातब्बर मंडळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची धुरा सांभाळणार आहेत.
इंदापूर गटातून – भरत शहा,शांतीलाल शिंदे,रवींद्र सरडे
कालठण गटातून -हर्षवर्धन पाटील,हनुमंत जाधव, छगन भोंगळे
शेळगाव गटातून – बाळासाहेब पाटील,राहुल जाधव,अंबादास शिंगाडे
भिगवण गटातून – पराग जाधव, विश्वास देवकाते,गायकवाड निवृत्ती भिकू
पळसदेव गटातून – भूषण प्रकाश काळे,प्रवीण देवकर,रतन हरिश्चंद्र देवकर
महिला राखीव – शारदा कुबेर पवार, कांचन अशोक कदम
अनुसूचित जाती जमाती – दुर्गे केशव विनायक
इतर मागास प्रवर्ग – सतीश उद्धव व्यवहारे
भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग – पारेकर हिरा शंकर
*“ब” वर्ग प्रतिनिधी -* वसंत मोहोळकर