कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे रविवारी ६ गटांमध्ये कर्मयोगी परिवार संवाद अभियान
हर्षवर्धन पाटील साधणार संवाद

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे रविवारी ६ गटांमध्ये कर्मयोगी परिवार संवाद अभियान
हर्षवर्धन पाटील साधणार संवाद
इंदापूर : प्रतिनिधी
महात्मा फुलेनगर (बिजवडी ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.३) ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी ६ ठिकाणी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या संवाद बैठकांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी केले आहे.या बैठकांमधून हर्षवर्धन पाटील हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संचालक मंडळासह संवाद साधणार आहेत.
सदरील बैठकांची ठिकाणे
१) बाभुळगाव :- छत्रपती शिवाजी महाराज चौक – वेळ सकाळी ९ वा. २) शिरसोडी :- श्री मारुती मंदिर वेळ- सकाळी १०.३० वा. ३) वरकुटे बुद्रुक :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर – वेळ दुपारी १२ वा. ४) पळसदेव :- श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर – वेळ सायंकाळी ४.०० वा. ५) भिगवण :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर – वेळ ५:३० वा. ६) शेळगाव :- संत मुक्ताबाई मंदिर – वेळ सायंकाळी ७ वा., या वेळेनुसार होणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष शहा व कार्यकारी संचालक लोकरे यांनी दिली.