शैक्षणिक

कर्मवीरांच्या त्यागातून रयत उभी राहिली – श्री विकास जाधव टेक्निकल मध्ये रयत चा106 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्राच्या जडणघडणीत रयत शिक्षण संस्थेचे योगदान

कर्मवीरांच्या त्यागातून रयत उभी राहिली – श्री विकास जाधव टेक्निकल मध्ये रयत चा106 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्राच्या जडणघडणीत रयत शिक्षण संस्थेचे योगदान

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनियर कॉलेज या विद्यालयांमध्ये रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आणि याच स्थापनेला 106 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा स्थापना दिन साजरा करण्यात आला .

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवानराव भिसे, उपमुख्याध्यापक श्री सतीश पाचपुते ,पर्यवेक्षिका सौ .अलका चौधर, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुल प्रमुख श्री अरविंद मोहिते यांनी केले .याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल व्याख्याते श्री विकास जाधव सर यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत रयत शिक्षण संस्थेचे योगदान याविषयी व्याख्यान दिले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात कर्मवीर अण्णांच्या त्याग व समर्पण वृत्तीने रयत शिक्षण संस्था उभी राहिली तसेच लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या असीम त्यागाने बहुजनांची मुले शिक्षण प्रवाहात आली याविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच रयत शिक्षण संस्था उभी राहत असताना आलेल्या अनंत अडचणी आणि आज त्या अडचणींवर मात करून या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवानराव भिसे यांनी कर्मवीर अण्णा यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेक गोरगरीब घरातील मुले शिक्षण घेऊ शकली हे नमूद करत रयत शिक्षण संस्थेची सध्याची वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सतीश पाचपुते यांनी वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत सर्वांचे आभार व्यक्त केले.

Back to top button