कहा नदीचे बंधऱ्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद बाबुर्डी व जळगाव येथील ३ गुन्हे उघड वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई…
चोरी केलेचे कबुल केलने सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
कहा नदीचे बंधऱ्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद बाबुर्डी व जळगाव येथील ३ गुन्हे उघड वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई…
चोरी केलेचे कबुल केलने सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन हदीत दिनांक- १४/०८/२०२१ २/१०/२०२१ गेजी मौजे बाबुर्डी-लोणीभापकर गावचे हददीत साळोबा डोह कन्हा नदीचे पात्रात बंधाऱ्यावरील बर्गे चोरी कम्न नेलेबाबन श्री शिवराज मानिक चांदगुडे धंदा नोकरी काहाटी ना यारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८१ / २०२१ भादवि ३७९, ३४ प्रमाणे दि. ०६/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल झालेला होता.
सदर गुन्हयाचे तपासात बंधाऱ्याचे वर्ग चोरी झालेबाबत माहीती मिळणे कामी खुप मोठया प्रमाणात सी.सी.टी.व्ही कॅमेरांची पडताळणी करुन तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित आरोपी निष्पन्न झालेने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे स.पो.नि.सोमनाथ लांडे व पोलीस तपास पथक यांनी संबंधित संशईत आरोपी नामे रूपेश मोहन इनामके वय २१ रा मु.शेरेचीवाडी पो.बाबुर्डी ता बारामती जि पुणे यास कोल्हापुर येथुन ताब्यात घेऊन त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केला असता.
इतर साथिदार २) पांडुरंग बंडाजी लडकत वय ३० रा मु.शेरेचीवाडी पो.बाबुर्डी ता बारामती जि पुणे ३) विवेक प्रकाश जराड वय २३ मुळ रा मु.पो. उंडवडी कडेपठार ता बारामती जि पुणे सध्या रा बुरुड गल्ली बारामती ता बारामती जि पुणे ४) अभिजित धोंडिबा तांबे वय २३ रा मु.पानसरेवाडी, पो सुपे ता बारामती जि पुणे ५) रियाज दिलावर सय्यद वय २८ रा रिसे–पिसे पो. राजुरी ता पुरंदर जि पुणे ६) मोहन रघुनाथ इनामके रा शेरेचीवाडी पो.बाबुर्डी ता बारामती जि पुणे ७) तेजस जालिंदर जमदाडे रा. पानसरेवाडी पो.सुपे ता बारामती (विधीसंर्घष बालक) यांचेसोबत बाबुर्डी, ता बारामती येथील व जळगाव ता बारामती येथील कहानदीचे पात्रातील बंधाऱ्याचे बर्गे चोरी केलेचे कबुल केलने सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री.डॉ.अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण, मा श्री मिलिंद मोहिते सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री.सोमनाथ लांडे (सहा. पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पो.ना. वापुसाहेब पानसरे, पो.ना. हिरामन खोमणे, पो.शि.पोपट नाळे, अमोल भुजबळ, किसन ताडगे, सचिन दरेकर, चा, पो.ना.शेंडकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक बापुसाहेब पानसरे हे करीत आहेत.