इंदापूर

काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी नाशीर शेख यांची निवड

मंत्री सुनील केदार यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी नाशीर शेख यांची निवड

मंत्री सुनील केदार यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

इंदापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित आढावा बैठकी दरम्यान लुमेवाडी येथील नाशीर शेख यांना इंदापूर तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र मंत्री सुनील केदार यांच्याहस्ते देण्यात आले.

नाशीर शेख हे लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्ग्याचे संस्थापक ट्रस्टी आहेत.गेल्या २५ वर्षांपासून ते ट्रस्टी म्हणून काम करतात. ते लुमेवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य ही आहेत.लुमेवाडी,सराटी,पिंपरी,टण्णू परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

प्रसंगी बोलताना नाशीर शेख म्हणाले की, जिल्हाध्यक्ष संजय जगताप,तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करेल.

यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जमीर काझी यांच्यासह इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जकिर काझी, शहराध्यक्ष चमन बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.संतोष होगले, सरचिटणीस महादेव लोंढे, निवास शेळके, संतोष आरडे,भगवान पासगे, जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आकाश पवार, अनुसूचित जाती जमाती विभाग सेलचे तालुकाध्यक्ष युवराज गायकवाड, श्रीनिवास पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram