काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण
गेल्या 10 वर्षांपासून त्या विविध आजारांशी झुंज देत आहेत
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण
गेल्या 10 वर्षांपासून त्या विविध आजारांशी झुंज देत आहेत
नवी दिल्लीः प्रतिनिधी
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. गांधी यांना बुधवारी सौम्य ताप आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. आज या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
तसेच, संपर्काता आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहनंही केलं आहे. गेल्या काही दिवसांत प्रियांका गांधी सोनिया गांधी यांच्यासोबत होत्या. त्यामुळे सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच, त्यांनी आपला लखनौ दौरा रद्द केला आहे. त्या दिल्लीला परतल्या आहेत.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचं समन्स
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीनं सांगितलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसनं हे सूडाचं राजकारण असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आम्ही ईडीच्या नोटीशीला घाबरणार नसल्याचंही रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं. आम्ही या नोटीशीला घाबरणार नाही आणि केंद्र सरकारसमोर झुकणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली होती.