कांबळेश्वरच्या आनंद बाजारात चिमुकल्यांनी घेतले आर्थिक धडे
काही वेळातच खाऊगल्ली पदार्थ खरेदी करून संपवले.

कांबळेश्वरच्या आनंद बाजारात चिमुकल्यांनी घेतले आर्थिक धडे
काही वेळातच खाऊगल्ली पदार्थ खरेदी करून संपवले.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वरच्या शाळेत आनंदी बाजारातून दररोजच्या अभ्यासा बरोबर मुलांना व्यवहार ज्ञानाचे धडे घेण्याचे कौशल्य मिळाले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच मंदाकिनी कानडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
विद्यार्थी आनंद बाजारामध्ये विविध प्रकारचा भजीपाला, फळे बिस्किटे,स्टेशनरी आदीचे स्टॉल आकर्षक पद्धतीने विद्यार्थ्यांनी मांडले होते. खाऊगल्ली मध्ये प्रामुख्याने पालकांनी स्वतः घरी बनवून आणलेले पदार्थ पाणीपुरी, वडापाव,भेळ, गुलाबजाम,चहा,लाडू, चिवडा,वड्या,चिक्की,शेंगदाणे,फुटाणे या पदार्थ खरेदीसाठी पालक विद्यार्थी यांची झुंबड उडाली होती.
काही वेळातच खाऊगल्ली पदार्थ खरेदी करून संपवले.या सर्व पदार्थांचा पालकांनी मनमुराद आस्वाद घेतला. तसेच विद्यार्थ्यांकडून भाजीपाला, फळे इतर वस्तूही पालकांनी खरेदी करून शालेय उपक्रमात सहभागी होऊन आनंद घेतला. शाळेच्या या उपक्रमातून विद्यार्थी प्रत्यक्ष व्यवहार कसे करायचे याचे ज्ञान मिळाले. सदर उपक्रमातून १२हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली. आनंदबाजार यशस्वीपणे पार पाडणेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते यांच्या बरोबर उपशिक्षिका सुनीता शिंदे,निर्मला खताळ, मनीषा चव्हाण यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.
उपसरपंच प्रकाश खलाटे,अध्यक्षा व्यवस्थापन समिती सीमा खलाटे,शोभा सावंत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते,किरण आगवणे, गिरीश खलाटे,ग्रामपंचायत सदस्य सचिन वाघमारे,पोलीस पाटील रणजित रावते,विशाल कानडे,भरत शिंदे,रामदास जगताप,किरण खलाटे,संजय शिंदे,प्रमोद शिंदे, सर्व पालक उपस्थितीत होते.