आपला जिल्हा

काटी – लाखेवाडी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत ढोले सरांनी प्रचारात घेतला वेग 

घड्याळ पोहचलं घरोघरी,सर्वच मतदारांचा भरभरून प्रतिसाद 

काटी – लाखेवाडी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत ढोले सरांनी प्रचारात घेतला वेग 

घड्याळ पोहचलं घरोघरी,सर्वच मतदारांचा भरभरून प्रतिसाद

इंदापूर :

इंदापूर तालुक्यातील काटी – लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारांचे दौरे, भेटीगाठी, बैठका आणि प्रचार सभांनी गावागावात चांगलाच जोर धरला आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीमंत ढोले सरांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवत सुरुवात केली असून त्यांच्या प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत गावोगावी फिरत श्रीमंत ढोले (सर) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, वाड्या-वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत.

श्रीमंत ढोले सरांनी प्रचारा दरम्यान ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा, महिला सक्षमीकरण,पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वीजप्रश्न, सामाजिक प्रश्न,आरोग्य सुविधा, तरुणांना रोजगार आणि महिलांच्या समस्या या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली आहे. गावाच्या विकासासाठी फक्त आश्वासन नको असे सांगत त्यांनी आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला.त्यामुळे काटी – लाखेवाडी गटातील अनेक गावांत त्यांच्या प्रचार फेरीला ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे.

 

तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार विलास बापू वाघमोडे यांच्या बाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले विकासकामे कागदावरच राहिली अशी माहिती ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. निवडणूक आली कीच आठवण होते पण नंतर गावाकडे कुणी फिरकत नाही अशी थेट प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे वाघमोडे यांच्या प्रचार दौऱ्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या गावागावात चर्चा रंगू लागल्या आहेत.

श्रीमंत ढोले सरांचा थेट ग्रामीण भाषेतील संवाद मतदारांच्या मनाला भावत असून त्यांनी या गटात केलेले सामाजिक काम फार मोठे व्यापक आहे. काटी – लाखेवाडी या गटात ढोले सरांना सर्व समाजातील मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळे त्यांच्या प्रचाराला दिवसें दिवस ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.काटी – लाखेवाडी गटातील लढत चांगलीच रंगतदार होत आहे. एकीकडे श्रीमंत ढोले सरांचा झंझावत प्रचार आणि दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात वाढत चाललेली नाराजी यामुळे या गटातील निवडणूक निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल देणार ? हे येत्या निवडणूक निकालातून स्पष्ट होणार.

Back to top button