कामगार महिलांसाठी सायबर सुरक्षेचे धडे; ‘Antifraud AI’ अॅपसह डिजिटल सुरक्षिततेची हमी
हे अॅप मोबाईलमधील अनोळखी अॅक्टिव्हिटी, फसवणूक आणि व्हायरसपासून संरक्षण करते

कामगार महिलांसाठी सायबर सुरक्षेचे धडे; ‘Antifraud AI’ अॅपसह डिजिटल सुरक्षिततेची हमी
हे अॅप मोबाईलमधील अनोळखी अॅक्टिव्हिटी, फसवणूक आणि व्हायरसपासून संरक्षण करते
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत विद्यालयातील कामगार महिलांसाठी सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थिनी वृषाली शिंदे व सानिका कापसे यांनी सायबर सुरक्षेविषयी माहितीपूर्ण सादरीकरण सादर केले.
सादरीकरणात सायबर हल्ले म्हणजे काय, त्यापासून संरक्षण कसे करावे, तसेच डिजिटल व्यवहार व सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शंका समाधान सत्रात सक्रिय सहभाग घेतला.
या कार्यक्रमात क्विक हील फाउंडेशनच्या ‘Antifraud AI’ या अॅपचे महत्त्व पटवून देत कामगार महिलांच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून देण्यात आले. हे अॅप मोबाईलमधील अनोळखी अॅक्टिव्हिटी, फसवणूक आणि व्हायरसपासून संरक्षण करते. यासोबतच महिलांना एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन कोड देण्यात आला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. राहुल शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली झाले. विद्यार्थिनींच्या सादरीकरणामुळे सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढली असून, डिजिटल काळात सुरक्षिततेची पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली.