
कारखेल मध्ये वीज पडून लागलेले पाणी गायब!
घटने ठिकाणी नागरिकांची गर्दी
बारामती वार्तापत्र
कारखेल मध्ये कोरेश्र्वर मंदिर परिसरात वीज पडल्याची बातमी समजताच पंचक्रोशीतील परिसरातून पाणी पाहण्यासाठी प्रंचड गर्दी जमा झाली काहींनी तर वीज कशी पडते पाणी , पाणी कशे असते, जिवंत पाणी म्हणजे काय, इतकचं नव्हे तर जिरायत भागातील आता कायमचा पाणी प्रश्न सुटला अशा चर्चा होऊ लागल्या पण रविवारी प्रत्यक्ष दर्शी कारखेल गावचे जेष्ठ नागरिक सुनिल आत्माराम वाबळे यांनी बारामती वार्तापत्रशी बोलताना सांगितले की , माळावरील पाणी हे तालिवर थोड्या फार प्रमाणात जमा झाले आणि नंतर उन्हाळ्यात जमिनीला भेगा पडतात त्यात हे पाणी जाऊन हवेचा दाब तयार झाला की, काही अंशी प्रमाणात पाण्याचे उत्सर्जन होऊन अशा घटना घडतात.
देऊळगाव रसाळ परिसरात गेल्या वर्षी अशाच प्रकारची घटना गाजली होती. पण पाणी दोन दिवसांनी ओसरले. वारंवार अशा घटना का घडत आहेत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आजही कारखेल परिसरात लोकांनी विजेचे पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. पण निराश होऊन परत गेले.
सोशल मीडिया वर ज्या वेगाने बातमी पसरत आहे तशी लोक त्या माळरानावर आपला मोर्चा वळवत आहे. लोकांनी अशा अफवेवर विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे.
ज्या ठिकाणी वीज पडली असे सांगण्यात आले त्या ठिकाणी काही ग्रामस्थांनी १ फूट खोदकाम केले तो भाग आज कोरडा ठणठणीत आहे. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली . त्या ठिकाणी उपस्थित असणारे देऊळगाव रसाळचे शिवाजी महिपती वाबळे यांनी बारामती वार्तापत्रशी बोलताना सांगितले की, ज्या ठिकाणी वीज पडते त्या ठिकाणी जिवंत पाणी असते ते कधीच आटत नाही. त्यासाठी त्या माळरानावर लोकांनी गर्दी करू आपला वेळ वाया घालवू नये.






