कार्यकर्त्यांची इच्छा अजितदादांनी केली पूर्ण चहाच्या टपरीच उद्घाटन तर केलंच शिवाय चहाचाही घेतला आस्वाद
‘चहाच्या टपरीचं उद्घाटन करा’, कार्यकर्त्याची इच्छा

कार्यकर्त्यांची इच्छा अजितदादांनी केली पूर्ण चहाच्या टपरीच उद्घाटन तर केलंच शिवाय चहाचाही घेतला आस्वाद
‘चहाच्या टपरीचं उद्घाटन करा’, कार्यकर्त्याची इच्छा
बारामती वार्तापत्र
हाच्या टपरीचं उद्घाटन करा’, कार्यकर्त्याची इच्छा, अजितदादा म्हणाले, ‘चहाला क्वालिटी हाय ना, आण बरं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहाच्या टपरीचं उद्घाटन करत चहाचा आस्वाद घेतला…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा बारामती दौऱ्यावर असताना त्यांची अनेक रुपे बारामतीकरांना पाहायला मिळतात. अजितदादांचं असंच एक दिलखुलास रुप आज बारामतीत पहायला मिळाले. माझ्या चहाच्या टपरीचं उद्घाटन करा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखलवल्यावर अजितदादांनी उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला.
‘चहाच्या टपरीचं उद्घाटन करा’, कार्यकर्त्याची इच्छा
बारामती दौऱ्यावर असताना एका टपरी चालकाने माझ्या चहाच्या टपरीचे उद्घाटन करा, अशी इच्छा अजितदादांजवळ व्यक्त केली. ती इच्छा व्यक्त करताच अजितदादांनी त्या टपरी चालकाच्या इच्छेला मान दिला. फिरत्या वाहनावर चहा स्टॉल सुरु केला आहे याचे उद्घाटन आपण करावे अशी इच्छा आहे, असं इच्छा बोलून दाखवल्आनंतर अजितदादा कार्यकर्त्याच्या टपरीवर पोहोचले.
‘चहाला क्वालिटी हाय ना?, आण बरं चहा’
आज बारामती मध्ये विविध कामाचे उद्घाटन अजित पवार करत होते. त्यानंतर बारामती येथे महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटपून जात कार्यकर्त्यांच्या टपरीचं उद्घाटन करण्यासाठी अजितदादा टपरीवर पोहोचले आणि कार्यकर्त्याच्या इच्छेखातर चहाच्या टपरीचे उद्घाटन केले. त्यानंतर अजितदादांनी ‘तू बनवलेला चहा कसाय?, चहाला क्वालिटी हाय ना?, आण बरं चहा’ असं म्हणत चहाची चवही घेतली.
कोणताही प्रोटोकॉल न मानता प्रसंगी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन अजित दादांनी आपल्या कार्यकर्त्याच्या इच्छेखातर एका चहाच्या टपरीचं उद्घाटन केलं. संबंधित टपरी चालकाचा तर आनंद गगनात मावत नव्हता. त्याच्या आनंद द्विगुणित झाला होता. बारामतीत अजितदादांच्या या दिलखुलास स्वभावाची आज एकच चर्चा होती.