कार्ला ता.मावळ जिल्हा पुणे येथे गावठी पिस्तुल आणि १ जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
एकूण ६०;१०० रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
कार्ला ता.मावळ जिल्हा पुणे येथे गावठी पिस्तुल आणि १ जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
एकूण ६०;१०० रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
बारामती वार्तापत्र
आज रोजी दि ११/१२/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे- मुंबई रोडवर लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते .सदरच्या पथकास गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून मौजे कार्ला ता मावळ येथील एकविरा देवी मंदिर फाटा येथे नवनाथ देवकर रा वेहेरगाव ता मावळ हा आपल्या कम्बरेला गावठी पिस्तुल लावून उभा असल्याचे कळाले वरून त्याठिकाणी सदर पथकाने जाऊन वरील सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कंबरेला आत एक लोखंडी वस्तू हाताला लागली सदरची वस्तू बाहेर काढून पाहिली असता सदरची वस्तू ही गावठी पिस्तुल असल्याचे समजले सदरील व्यक्तीचे अधिक झडती मध्ये पॅन्ट च्या उजव्या खिश्यात एक जिवंत काडतुस मिळून आले सदरील व्यक्तीचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नवनाथ राजू देवकर वय २३ वर्षे रा वेहेरगाव ता मावळ जिल्हा पुणे असे सांगितले सदरील इसमाचे ताब्यात पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला
१) ५०;००० रु किंमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगजिन सह
२) १०० रु किंमतीचे एक जिवंत काडतुस ३) १०:०००रु एक ओपो कंपनीचा मोबाईल फोन एकूण ६०;१०० रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यास सदर हत्यार कोणाकडून आणले याबाबत तपास करता त्याने सदर हत्यार राहुल बरकू मांडुळे वय २३ रा थोरण ता मावळ जिल्हा पुणे यांचेकडून घेतल्याचे सांगितले.त्यास ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी १) नवनाथ राजू देवकर वय २३ वर्षे रा वेहेरगाव ता मावळ जिल्हा पुणे २) राहुल बरकू मांडुळे वय २३ रा थोरण ता मावळ जिल्हा पुणे यांना मुद्देमाल सह पुढील तपास कामी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .
सदरची कारवाई ही
मा पोलिस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो
मा.अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील
मा. सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय अधिकारी श्री नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सहा.
पोलिस निरीक्षक
पृथ्वीराज ताटे
सहा.फौजदार विजय पाटील
सहा.फौजदार शब्बीर पठाण
पो हवा. प्रकाश वाघमारे
पो हवा.सुनिल जावळे
पो हवा सुनील वाणी
पो हवा सचिन गायकवाड
पो हवा.विद्याधर निचित
पो ना गुरू जाधव स्था गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केली आहे.