काऱ्हाटी संकुलामध्ये गुणोत्त्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन
स्पर्धांमध्ये एकूण 473 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता
काऱ्हाटी संकुलामध्ये गुणोत्त्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन
स्पर्धांमध्ये एकूण 473 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता
बारामती वार्तापत्र
कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या संचालिका आदरणीय सौ.सुनेत्रा(वहिनीसाहेब) पवार (राज्यसभा खासदार, भारत सरकार) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हेतू “गुणोत्त्सव 2024…उधळण कलागुणांची” (वर्ष 2 रे) या उपक्रमा अंतर्गत तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन काऱ्हाटी संकुलामध्ये वार-शुक्रवार दि-२९/११/२०२४ रोजी करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत वसतिगृह माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने वकृत्व स्पर्धा (जिल्हास्तरीय), प्राथमिक शाळा या विभागाने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (तालुकास्तरीय), न्यू इंग्लिश स्कूल,ढाकाळे या विभागाने निबंध स्पर्धा (जिल्हास्तरीय), औद्योगिक प्रशिक्षण संस्था या विभागाने स्किल रिल्स स्पर्धा (राज्यस्तरीय), गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल या विभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धा (जिल्हास्तरीय) व शारदाबाई पवार कला महाविद्यालयाने कला शिक्षकांसाठी फलक लेखन स्पर्धा (जिल्हास्तरीय) चे आयोजन केले होते.
या विविध स्पर्धांमध्ये एकूण 473 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या “गुणोत्त्सव 2024” मधील स्पर्धांचे उद्घाटन मा.श्री. माधव जोशी सर (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, बारामती) यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विनोद खटके व श्री मनोज कुंभार यांची उपस्थिती लाभली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. दशरथ दादा धुमाळ सो, संचालक श्री.सय्यद दस्तगीर सर, श्री. दत्तात्रय वाबळे सो, प्राचार्या सौ. अनिता चव्हाण, सौ. कमल गाडेकर, सौ. सुप्रिया आहेरकर, प्राचार्य श्री. संतोष शिर्के, श्री गिरीश कुंभार तसेच उपप्राचार्य श्री भाऊसो पिसाळ, श्री. महेश चांदगुडे, सर्व विभागांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. विकास निर्मल यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. संदीप लोणकर व श्री. आबासाहेब कोकरे यांनी तर आभार श्री. राहुल जाधव यांनी मानले.
गुणोत्त्सव 2024 या उपक्रमामध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी खालील प्रमाणे:-
• वकृत्व स्पर्धा: लहान गट (इ 5 वी ते 8 वी) प्रथम क्रमांक- खेडकर प्रसाद उमेश (विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मीडियम स्कूल), द्वितीय क्रमांक- खोत काव्या सुधीर (विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर, बारामती), तृतीय क्रमांक- लोणकर अमृता शरद (वसतिगृह विद्यालय, काऱ्हाटी)
• वकृत्व स्पर्धा: (मोठा गट इ 9 वी ते 12 वी) प्रथम क्रमांक- जांबले वैष्णव संतोष (विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा, बारामती) द्वितीय क्रमांक- जगताप संस्कृती संजय (नवमहाराष्ट्र विद्यालय, पणदरे), तृतीय क्रमांक- नांगरे आकांशा कांतीलाल (कै. जिजाबाई विद्यालय, पारवडी)
• सुंदर हस्ताक्षर स्पर्धा: (लहान गट इ 1 ली ते 2 री) प्रथम क्रमांक- खलाटे अर्णव सुनील (विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळा, बारामती), द्वितीय क्रमांक- पोमणे अवनीश महेश (प्राथमिक शाळा, काऱ्हाटी), तृतीय क्रमांक- बेलदार शिवन्या नितीन (की एज्युकेशन, गुणवडी)
• सुंदर हस्ताक्षर स्पर्धा: (मोठा गट इ. 3 ते 4 थी) प्रथम क्रमांक-माने दुर्वा सोमनाथ (प्राथमिक विद्यालय, पणदरे) द्वितीय क्रमांक- जगताप धैर्य विलास (विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळा, बारामती), तृतीय क्रमांक- लोणकर अंकिता शरद (प्राथमिक शाळा, काऱ्हाटी)
• निबंध स्पर्धा: (लहान गट इ.5 वी ते 8 वी) प्रथम क्रमांक-साबळे स्नेहल संतोष (की एज्युकेशन गुणवडी), द्वितीय क्रमांक-निंबाळकर राज नंदिनी राहुल (जिजाऊ ज्ञान मंदिर भिकोबा नगर), तृतीय क्रमांक- लोणकर अक्षय दीपक (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, काऱ्हाटी)
• निबंध स्पर्धा: (मोठा गट इ 9 वी ते 12 वी) प्रथम क्रमांक- वाडकर तनिष्का सोनबा (शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर), द्वितीय क्रमांक- कऱ्हाळे संजीवनी उत्तम (न्यू इंग्लिश स्कूल, ढाकाळे) तृतीय क्रमांक-भिलारे सिद्धी महेंद्र (वसतीगृह विद्यालय, काऱ्हाटी)
• स्किल रिल्स स्पर्धा: प्रथम क्रमांक- गायकवाड सुहानी (आय टी आय, काऱ्हाटी) द्वितीय क्रमांक- सुतार वैभव (आयटीआय काऱ्हाटी) तृतीय क्रमांक- बेचके आदित्य (आयटीआय शारदानगर) उत्तेजनार्थ- मांडे सिद्धेश (आयटीआय काऱ्हाटी)
• प्रश्नमंजुषा स्पर्धा: गट (3 री ते 5 वी) प्रथम क्रमांक-ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ, द्वितीय क्रमांक -अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती, तृतीय क्रमांक-जिजाऊ ज्ञान मंदिर भिकोबानगर
• प्रश्नमंजुषा स्पर्धा: गट 2 (6 वी ते 8 वी) प्रथम क्रमांक- अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती, द्वितीय क्रमांक- गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, काऱ्हाटी, तृतीय क्रमांक- विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर, बारामती
• प्रश्नमंजुषा स्पर्धा: गट 3 (9 वी ते 10 वी) प्रथम क्रमांक-गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, काऱ्हाटी, द्वितीय क्रमांक- शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, तृतीय क्रमांक-बाल विकास मंदिर, बारामती फलक लेखन स्पर्धा: प्रथम क्रमांक- श्री.अतुल गायकवाड (वर्धमान विद्यालय,वालचंदनगर) द्वितीय क्रमांक-श्री.भारत काळे (एम एस हायस्कूल बारामती) तृतीय क्रमांक-श्री.महेंद्र दीक्षित (धो.आ. सातव विद्यालय, बारामती), तृतीय क्रमांक-श्री. अजित जगताप (विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मीडियम स्कूल,बारामती), उत्तेजनार्थ- सौ. पूनम निंबाळकर (बाल विकास इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती)
या स्पर्धा यशस्वी होणेकरिता समन्व्यक म्हणून श्री. आबासाहेब कोकरे, श्री. प्रितम जंगम,श्री. राहुल जाधव, श्री. चंद्रसिंग कोकणी, सौ. अस्मिता वाबळे, श्री. पिंटू एजगर यांनी जबाबदारी पार पाडली.
या स्पर्धेमधील सर्व यशस्वी व सहभागी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अजित दादा पवार सो, संचालिका सौ. सुनेत्रा (वहिनीसाहेब) पवार, सचिव श्री.प्रफुल्ल तावरे सो, खजिनदार श्री. सुभाष सोमाणी सो तसेच सर्व संचालक यांनी अभिनंदन केले अशी माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री.विकास निर्मल यांनी दिली.