६३ नमुन्यांपैकी पाचजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
वाणेवाडी, मेखळी, कांबळेश्वर आणि आमराईतील रुग्णांचा समावेश..
बारामतीत नव्याने पाचजणांना कोरोनाची लागण; ५८ जण निगेटिव्ह..
वाणेवाडी, मेखळी, कांबळेश्वर आणि आमराईतील रुग्णांचा समावेश..
बारामती शहर आणि तालुक्यात काल घेतलेल्या ६३ नमुन्यांपैकी पाचजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील ३४ वर्षीय महिला, मेखळी येथील ६० वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील २९ वर्षीय तरुण आणि बारामती शहरातील आमराई येथील ५९ वर्षीय महिलेसह तिच्या २५ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहर आणि तालुक्यातील ६३ जणांची काल तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण ५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाचजणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील ३४ वर्षीय महिला, मेखळी येथील ६० वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील २९ वर्षीय तरुण आणि बारामती शहरातील आमराई येथील ५९ वर्षीय महिलेसह तिच्या २५ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली .