इंदापूर

डिझेल दरवाढीचा इंदापूर अर्थमूव्हर्सकडून निषेध ; १ नोव्हेंबर पासून करणार भाडेवाढ

इंदापूर युनियनने घेतला निर्णय

डिझेल दरवाढीचा इंदापूर अर्थमूव्हर्सकडून निषेध ; १ नोव्हेंबर पासून करणार भाडेवाढ

इंदापूर युनियनने घेतला निर्णय

इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत इंधन दरवाढ होत आहे.त्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज काढून जेसीबीमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यवसायिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत असल्याने शासनाचा निषेध व्यक्त करत एक दिवस काम बंद आंदोलन जेसीबी धारकांकडून करण्यात आले.सध्या जेसीबी धारकांना तासी १ हजार रुपये भाडे मिळत आहे.परंतु १ नोव्हेंबर पासून प्रति तास दोनशे रुपये वाढ करून बाराशे रुपये आकारण्यात येणार असल्याचा निर्णय इंदापूर अर्थमूव्हर्स युनियनने घेतला आहे.

यावेळी बोलताना जेसीबी व्यावसायिक अमोल खराडे म्हणाले की,जेसीबी,पोकलेन,ट्रॅक्टर आदी घेऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचे सपाटीकरण करणे,चारी खोदणे अशी विविध कामे करून सर्वांचा उदरनिर्वाह होत असतो.परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व कामे बंद होती.बँकेचे व फायनान्स कंपन्यांचे हफ्ते थकलेले आहेत.त्यामुळे बँका,फायनान्स कंपन्या हप्ते भरण्यासाठी कर्जदारांमागे तगादा लावत आहेत.अशातच भर म्हणून सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे व्यवसायातील तोटा लक्षात घेता इंदापूर अर्थमूव्हर्स युनियन कडून भाडेवाढीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

यावेळी सागर चव्हाण,अमोल चोपडे,राहुल वाघमोडे,सचिन ठावरे,महेश पवार,अशोक जाधव,महेश जाधव,नाना सागर,विजय जाधव,शुभम दिवसे,आदित्य चौगुले,श्री.जगताप आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button