काही गोष्टिंना शिथीलता देऊन बारामतीत लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढ.
बँकीग सेवा सार्वजनिक व इतर सुट्या वगळता सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु राहणार आहेत. हॉटेल व रेस्टॉरंटना ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून सेवा देता येणार नाही मात्र त्यांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरपोच पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे

काही गोष्टिंना शिथीलता देऊन बारामतीत लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढ.
बँकीग सेवा सार्वजनिक व इतर सुट्या वगळता सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु राहणार आहेत. हॉटेल व रेस्टॉरंटना ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून सेवा देता येणार नाही मात्र त्यांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरपोच पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे
बारामती वार्तापत्र
१) तालुक्यातील सर्व आरोग्य विषयक सुविधा म्हणजेच दवाखाने, मेडीकल २४ तास सुरु राहतील.
२) फळे व भाजीपाला, किराणा, गॅस वितरण, दुध वितरण, मान्सून पुर्व कामे, पाणी पुरवठा बाबत कामे, कृषी व
कृषी संलग्न व्यावसाय, पशुखाद्य दुकाने सकाळी ०७.०० ते सकाळी ११.०० वा. पर्यंत सुरु राहतील.
३) बारामती तालुक्यातील वरील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने संपुर्णता बंद राहतील.
४) मा. राज्य शासन यांचेकडील ब्रेक द चेन No.DIU/ 2020 CR९२/ DisM-1. दि .१२ मे २०२१ रोजीच्या
आदेशामधील इतर अत्यावश्यक सेवामध्ये केवळ घरपोहोच सेवा सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत सुरु राहतील.
५) बँकींग सेवा मा. राज्य शासन यांचेकडील ब्रेक द चेन No.DIU/ 2020 CR९२/ Dis.11-1. दि .१२ मे
२०२१ रोजीच्या आदेशामध्ये नमृद केल्याप्रमाणे राहतील.
६) मा. राज्य शासन यांचेकडील ब्रेक द चेन No.DIU/2020 CR९२/DisM-1. दि .१२ मे २०२१ रोजीच्या
आदेशामध्ये नमूद केलले निबंध बारामती तालुक्यामध्ये सुरु राहतील.
सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य
संतृ अॅप डाऊनलोड केल्याची खात्री करुन घ्यावी.आरोग्य सेतू अॅपच्या मध्यमातून रोगाची संभाव्य विषाणूची लागण
विषयी सुचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्यांचा उपयोग होतो.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुध्द कोणतीही, व्यक्ती, संस्था, भारतीय दंड संहितेच्या कलम १८८
अन्वये कायदेशीर कारवाई करण्याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ यांची कलमे ५१ ते ६० च्या तरतुदीनुसार
कार्यवाही करण्यास पात्र राहतील.
व्यापारी कमालीचे नाराज-गेल्या 43 दिवसांपासून दुकाने बंद असल्याने बारामतीचे व्यापारी कमालीचे नाराज आहेत.
राज्य शासनाचा लॉकडाऊन 1 जून पर्यंत असल्याने बारामतीचे प्रशासन त्या बाबत काहीच करु शकत नाही. बारामतीची परिस्थिती निवळत असल्याने काही काळ तरी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी व्यापा-यांची मागणी आहे. राज्य शासनाने जिल्हाधिका-यांना या बाबत निर्णय घेण्याचे अधिकार द्यायला हवेत, जेथे परिस्थिती निवळते आहे, तेथे सवलत दिल्यास नुकसान कमी होऊ शकेल, अशी व्यापा-यांची भूमिका आहे. अजून दोन आठवडे दुकाने बंद ठेवणे न परवडणारे असून अनेक व्यापारी आता आर्थिक संकटात असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी नमूद केले. शासनाने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी बारामतीच्या व्यापा-यांची मागणी आहे.