कुटुंब प्रबोधनातून कुटुंब संस्कृतीचे जतन शक्य – प्रा. गोविंद कुलकर्णी
स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ
कुटुंब प्रबोधनातून कुटुंब संस्कृतीचे जतन शक्य – प्रा. गोविंद कुलकर्णी
स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ
बारामती वार्तापत्र
आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंब व्यवस्था आणि परंपरागत संस्कारांवर मोठा प्रभाव पडत आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि व्यस्त जीवनशैलीमुळे कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे.
अशा परिस्थितीत कुटुंब प्रबोधन हा कुटुंब संस्कृती जपण्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकतो, असे मत व्याख्याते व कै. ग.भि. देशपांडे विद्यालयाचे महामात्र प्रा.डॉ.गोविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
बारामती तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने महिला शिक्षिका स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ मएसो सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी वरील मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
भाषा,वेशभूषा,भोजन,भवन,भ्रमण,भजन या सहा ‘भ’ चे कुटूंबांवर प्रबोधन झाल्यास कुटुंब संस्कृती पुन्हा पूर्वीसारखी होवू शकेल असे विचार त्यांनी मांडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक पेशवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक परिषदेचे कार्यवाह महेश शेलार , वाघिरे हायस्कूल मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी , शिक्षक परिषद पुणे विभाग संघटन मंत्री रामदास अभंग , शिरूर तालुका शिक्षक परिषद अध्यक्ष प्रविण आढाव, शिरूर तालुका शिक्षक परिषद कार्याध्यक्ष विकास घुले ,शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, मएसोच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड, उपमुख्याध्यापक राजाराम गावडे , मोनिका खेडेकर, सोनाली क्षिरसागर, अनिता तावरे,पर्यवेक्षक दिलीप पाटील, शेखर जाधव, जयश्री शिंदे ,बारामती तालुका शिक्षक परिषद कार्याध्यक्ष रवींद्र गडकर, खजिनदार राजेंद्र जगताप,कार्यवाह सोमनाथ जंजिरे, सहकार्यवाह रवींद्र शितोळे,विजय काळे,आशिष केंडे, कार्यकारणी सदस्य सुनील खोमणे,अमित पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक दत्तात्रेय म्हस्के, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सनगर यांनी केले तर आभार बारामती तालुका शिक्षक परिषद अध्यक्ष दादासाहेब वनवे यांनी मानले .