शैक्षणिक

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा भव्य सोहळा; रेकॉर्ड ब्रेक राख्या बांधत बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग

लाडक्या बहिणींचा कृषिमंत्री भरणेना राखीचा मान"..

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा भव्य सोहळा; रेकॉर्ड ब्रेक राख्या बांधत बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग

लाडक्या बहिणींचा कृषिमंत्री भरणेना राखीचा मान”..

इंदापूर;प्रतिनिधि

तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य बहिणींच्या मनात ‘मोठा भाऊ’ म्हणून स्थान मिळवलेले राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे केवळ राजकारणापुरतेच नव्हे, तर मानवी नात्यांच्या जोपासनेतही आघाडीवर आहेत. बहिणींसाठी त्यांचे नेहमीच मोठे योगदान आणि आपुलकी दिसून आलेली आहे. या स्नेहाची प्रचिती रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली.

रक्षाबंधनाचे औचित्य साधून आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भव्य राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळ पासूनच तालुक्यातील तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या बहिणींची भरणे निवासस्थानी गर्दी झाली होती. प्रत्येक बहिणीने प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे प्रतिक असलेली राखी त्यांच्या हातावर बांधली आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

या प्रसंगी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. काही बहिणींनी आपल्या भावना व्यक्त करताना, “ कृषी मंत्री भरणे मामा हे आमच्यासाठी केवळ मंत्री नाहीत, तर खऱ्या अर्थाने आधारवड आहेत,” असे सांगितले. कृषिमंत्री भरणे यांनीही बहिणींना आशीर्वाद देत त्यांच्या सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा शब्द दिला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र स्नेहबंध अधिक घट्ट झाला. लाडक्या बहिणी आणि मोठा भाऊ यांच्यातील ही प्रेमळ भेट, रक्षाबंधनाच्या दिवशी इंदापूरसह संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली…

Related Articles

Back to top button