कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या प्रयत्नातून इंदापूरात दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांकरिता तपासणी शिबिर
विविध साहित्य वाटप केले जाणार

कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या प्रयत्नातून इंदापूरात दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांकरिता तपासणी शिबिर
विविध साहित्य वाटप केले जाणार
इंदापूर; प्रतिनिधि
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या विशेष प्रयत्नातून तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) आणि कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील दिव्यांगांना आवश्यक त्या साहित्याचा लाभ मिळून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांनी UDID कार्ड (अनिवार्य), दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, वार्षिक उत्पन्न दाखला (₹2,70,000/- पर्यंत), पिवळे/केसरी रेशनकार्ड अथवा ग्रामपंचायत सरपंच दाखला यांची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे.
साहित्याची उपलब्धता
या शिबिरानंतर दिव्यांगांच्या व वयोश्री योजनेच्या प्रकारानुसार विविध साहित्य वाटप केले जाणार आहे.
अस्थी व्यंग व्यक्तींसाठी
तीनचाकी सायकल, व्हील चेअर, काठी-कुबडी, साधी चेअर, कृत्रिम अवयव (हात-पाय).
अंध प्रवर्ग (100%) प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ब्रेल किट, अंध काठी. इयत्ता दहावी नंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन तसेच सुगम्य केन व सीन्सर अंध काठी देण्यात येणार आहे. यासाठी शाळा/कॉलेजचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक राहील.
आवश्यक अटी व सूचना
1. बॅटरी ऑपरेटेड तीनचाकी सायकलसाठी किमान 80% दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक. (लाभार्थी बहिरा, अंध, मतिमंद नसावा तसेच दोन्ही हात कार्यक्षम असावेत.)
2. मागील तीन वर्षांत कुठल्याही प्रकारचे साहित्य घेतलेले नसावे.
3. बॅटरी ऑपरेटेड तीनचाकी सायकल व स्मार्टफोनसाठी लाभार्थीने मागील वर्षी लाभ घेतलेला नसावा.
शिबिराचे वेळापत्रक
शनिवार, दि. 30 ऑगस्ट 25
सकाळी 9 ते सायं. 5
स्थळ : शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर
रविवार, दि. 31 ऑगस्ट 25
सकाळी 9 ते सायं. 5
स्थळ : अतिथी मंगल कार्यालय, अंथुर्णे
या उपक्रमाचे उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते होणार असून शेकडो दिव्यांग बांधवांना जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक साहित्य मिळणार आहे. समाजातील वंचित घटकांना हातभार लावण्याचा या उपक्रमामागील उद्देश असून, यामुळे दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास व स्वावलंबन वाढण्यास मोठी मदत होणार आहे.