स्थानिक

नवागतांच्या स्वागताने उत्साहात भरली टेक्निकल शाळा

विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताश्यांच्या गजरात गुलाबपुष्प देऊन करण्यात आले._

नवागतांच्या स्वागताने उत्साहात भरली टेक्निकल शाळा

विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताश्यांच्या गजरात गुलाबपुष्प देऊन करण्यात आले._

बारामती वार्तापत्रक 

बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व जुनीअर कॉलेज या ठिकाणी इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतची शाळा तसेच ११ व १२ वी विज्ञान व एम सी व्ही सी विभाग शासन निर्णयानुसार आज (दि:४) रोजी मोठ्या उत्साहात व आनंदात भरली.

यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताश्यांच्या गजरात गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थांपैकी इ ८ वी च्या विद्यार्थाना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठपुस्तके वाटप करण्यात आली. कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत सर्व विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. तसेच सर्व वर्गखोल्या निर्जंतुक करण्यात आल्या होत्या. बऱ्याच दिवसांनी शाळा भरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत विद्यालयाचे प्राचार्य झाकीर शेख, उपमुख्याध्यापक कल्याण देवडे, पर्यवेक्षक रमेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपशिक्षक तानाजी शिंदे, सुदाम गायकवाड, प्रदीप पळसे, मोहन ओमासे, सुनील चांदगुडे, गुळवे, सुधीर जाधव, सौ जयश्री हिवरकर , दाते तसेच विद्यालयातील इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button