धक्कादायक; श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घरगुती वादातून राग अनावर झाल्यामुळे,डॉक्टरने भावावरच केला गोळीबार
खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

धक्कादायक; श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घरगुती वादातून राग अनावर झाल्यामुळे,डॉक्टरने भावावरच केला गोळीबार
खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत
प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घरगुती वादातून राग अनावर झाल्यामुळे डॉक्टर भावाने दुकानदार भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या गोळीबारात दुकानदार भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकारानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षुल्लक भांडणामुळे भावावर गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे विजय मुनोत आणि मनोज मुनोत हे दोन भाऊ राहतात. यातील विजय मुनोत हा डॉक्टर आहे. या दोन्ही भावांमध्ये कौकुंबिक कारणातून वाद झाला. हा वाद नंतर टोकाला गेला. भांडणादरम्यान राग अनावर झाल्यामुळे विजय मुनोत याने आपला भाऊ मनोज मुनोत याच्यावर थेट गोळीबार केला. या घटनेमुळे काश्टी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिलेन पाहणी केली. डॉक्टर विजय मुनोत याने मनोज देवीचंद मुनोत यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.
गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरु
या गोळीबारात मनोज मुनोत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी 11 च्या सुमारास ही घटना घडली. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.