कृषी पंढरी बारामतीत उद्यापासून ‘कृषी तंत्रज्ञान’ सप्ताहाचा शुभारंभ
वर्ल्डमधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या प्रक्रिया उद्योगाशी निगडित लाईव्ह डेमो पाहता येतील.
कृषी पंढरी बारामतीत उद्यापासून ‘कृषी तंत्रज्ञान’ सप्ताहाचा शुभारंभ
वर्ल्डमधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या प्रक्रिया उद्योगाशी निगडित लाईव्ह डेमो पाहता येतील.
बारामती वार्तापत्र
बारामती ( शारदानगर ) येथील कृषी विज्ञान केंद्रावर १८ ते २४ जानेवारीदरम्यान कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली. या सप्ताहाच्या उद्घाटनास ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, ना. जयंत पाटील, ना. विश्वजित कदम, शंकरराव गडाख, दत्तात्रय भरणे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, उपसंचालक सुरेश चौधरी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राज्याचे
कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, डॉ.सुहास जोशी हे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बायर कंपनी यांच्या माध्यमातून हा कृषी तंत्रज्ञान सप्ताह पार पडत आहे.
दरवर्षी या कृषी प्रदर्शनात राज्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती ,नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून घेण्याची पर्वणी या प्रदर्शनातून होत असते. याचे स्वरूप जरी बदलले असले तरी प्रदर्शना प्रमाणेच सर्व माहिती या सप्ताहात शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या माहितीचा व तंत्रज्ञान अवगत करून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
दरवर्षीच्या कृषक प्रदर्शनातील क्षेत्र भेटीसह फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटींग, ब्रँडींग आदी तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. याशिवाय मिलेट वर्ल्डमधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या प्रक्रिया उद्योगाशी निगडित लाईव्ह डेमो पाहता येतील. कोरोना पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.