कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या पाठिंब्याने श्रीमंत ढोले यांची ताकद दुणावली; काटी–लाखेवाडी गटात प्रचारात आघाडी
ढोले यांची प्रचारातील आघाडी अधिक ठळक

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या पाठिंब्याने श्रीमंत ढोले यांची ताकद दुणावली; काटी–लाखेवाडी गटात प्रचारात आघाडी
ढोले यांची प्रचारातील आघाडी अधिक ठळक
इंदापूर आदित्य बोराटे –
काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे एकत्र आल्याने उमेदवार श्रीमंत ढोले यांना भक्कम राजकीय व संघटनात्मक पाठबळ मिळाले आहे. या प्रमुख नेत्यांच्या एकजुटीमुळे संपूर्ण गटात निवडणुकीचे वातावरण सकारात्मक झाले असून ढोले यांची प्रचारातील आघाडी अधिक ठळक होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीमंत ढोले यांनी प्रचाराला वेग दिला असून आतापर्यंत तीन ते चार वेळा संपूर्ण गटात घर-टू-घर प्रचार फेरी पूर्ण केली आहे. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून थेट नागरिकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या पद्धतीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेण्याची आणि त्यावर ठोस भूमिका मांडण्याची त्यांची पद्धत नागरिकांच्या मनाला भिडत आहे.

नेहमी ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि अडीअडचणींमध्ये धावून जाणारे नेतृत्व म्हणून श्रीमंत ढोले यांची ओळख आहे. ते उच्च शिक्षित असून विकासाकडे नियोजनबद्ध व दूरदृष्टीने पाहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.
यापूर्वी ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले असून त्या काळात शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक सुविधा तसेच विविध विकासाभिमुख कामे त्यांनी प्रभावीपणे मार्गी लावली आहेत. त्या कामांची प्रत्यक्ष अनुभूती नागरिकांनी घेतल्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी विश्वास कायम आहे.

प्रचारात महिलांचा सहभागही निवडणुकीला बळ देणारा ठरत आहे. ढोले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी तथा लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच चित्रलेखा ढोले आणि कन्या अक्षता ढोले या घर-टू-घर प्रचार करत असून महिलांशी थेट संवाद साधत आहेत. महिलांच्या प्रश्नांवर संवाद साधल्याने महिला मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
प्रमुख नेत्यांचा पाठिंबा, विकासाचा अनुभव, उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी आणि कुटुंबीयांचा सक्रिय प्रचार या सर्व बाबींमुळे श्रीमंत ढोले यांची ताकद अधिक भक्कम झाली असून काटी–लाखेवाडी गटात त्यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





