कृषी विधेयक रद्द न केल्यास आंदोलन तीव्र – अमोल भोईटे
आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा
बारामती वार्तापत्र
शेतकऱ्यांचा विरोध असूनही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात कायदे पारित करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहे या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा नसून त्याचा तोटाच शेतकऱ्यांना होणार आहे केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांची एवढीच कळकळ असेल तर केंद्र सरकारने विनाअट शेतकरी पिकवत असलेल्या प्रत्येक प्रकारच्या शेतमालाला हमीभाव द्यावा मात्र हमी भावाविषयी चकार शब्दही न काढणारे केंद्रसरकार शेतकऱ्यांच्या विरोधात हा कायदा पुढे रेटत आहे त्याचा आम्ही सर्व शेतकरी निषेध करत आहोत केंद्र सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे यांनी दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम ,सणसर सोसायटीचे माजी चेअरमन विक्रमसिंह निंबाळकर यांचीही भाषणे झाली.
ज्या कायद्याच्या विरोधात शेतकरी उभा आहे ते कायदे सरकार कशासाठी पुढे करत आहे हे अनाकलनीय आहे दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवर केंद्र सरकार दबाव आणत असून हे आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारने प्रयत्न करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भवानीनगर येथील व्यापार पेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. आंदोलनात व्यापारी प्रतिनिधी अशोकराव काळे, निलेश सोनवणे, दत्तात्रय शितोळे, पवन चव्हाण , नेताजी गायकवाड ,महेश भोईटे ,सोनू गोरे, दिपक खाडे ,दत्तात्रेय होनराव, चंद्रकांत कांबळे ,मोहन कांबळे, दिलीप तुपे ,किशोर सर्जे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते