कॅनॉलचे अस्तरीकरण करताना पाझर राहिल याची दक्षता घ्यावी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन
कॅनॉलचे अस्तरीकरण करताना पाझर राहिल याची दक्षता घ्यावी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन
बारामती वार्तापत्र
सध्या बारामती शहरातील निरा डावा कालव्याचे अस्तरीकरनाचे काम सुरू आहे हे अस्तरीकरण करताना जागोजागी तीन इंच व्यासाची छिद्रे ठेवण्याची गरज आहे त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल, कॅनॉल च्या कडेला असणारी झाडे जगतील तसेच पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल व शेतकऱ्यांचे नुकसानही टळणार आहे याबाबत दक्षता घ्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
नीरा डावा कालवा वर अस्तरीकरण काम चालू असल्यामुळे कॅनॉलमधून शेतकऱ्यांच्या विहिरींना पाझरा द्वारे पाणी मिळणार नाही तसेच शहरातही अनेक ठिकाणी बोरवेल आहेत ती बोरवेल ही कोरडी पडतील. अनेक शेतकऱ्यांच्या कॅनॉल च्या कडेला विहिरी आहेत तसेच कॅनॉल पासून लांब असणाऱ्या विहिरीही या कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असतात हा कॅनॉल ब्रिटिशकालीन असून एकशे पंचवीस वर्षांपूर्वी तयार केलेला आहे त्यामुळे या अस्तरीकरण याच्या कामांमध्ये जागोजागी छिद्रे ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
याविषयीचे निवेदन कार्यकारी उपअभियंता अश्विन पवार यांना देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड अमोल सातकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठलराव देवकाते ,डॉ नवनाथ मलगुंडे, किशोर सातकर ,निखील दांगडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते