केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक
नाशिक पोलीस राणेंना घेऊन नाशिकच्या दिशेनं रवाना झाले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक
नाशिक पोलीस राणेंना घेऊन नाशिकच्या दिशेनं रवाना झाले आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक करुन त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. त्यानंतर नाशिक पोलीस राणेंना घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्यानंतर राणे यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राणेंच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन नाशिककडे निघाले.
अटकेनंतरची प्रक्रिया कशी असेल?
राणेंवर कारवाई होईल असं वाटतं नाही, पण त्यांचं वक्तव्य हे सुसंस्कृत नाही. हा सगळा राजकारणाचा भाग आहे. संविधानिक नाही. जन आशिर्वाद यात्रेतील वक्तव्य हे राजकारण आणि त्यानंतरची कारवाईही राजकारणच आहे. हा लोकशाहीचा पराभव आहे. राणेंना रत्नागिरी कोर्टातच न्यावं लागेल. नारायण राणेंविरोधातील गुन्हा सिद्ध होणं फार अवघड आहे, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.