
बारामतीत सायबर डायनामिक्स युनियन कामगार विकास पॅनलचा एकहाती विजय
एकहाती सत्ता स्थापन
बारामती वार्तापत्र
बारामती येथे सायबर डायनामिक्स कामगार युनियनच्या निवडणुकीत कामगार विकास पॅनलने एकहाती बहुमत मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. 1947 पासून अस्तित्वात असलेल्या या ऐतिहासिक कामगार युनियनमध्ये यापूर्वी विविध गटांची सत्ता बदलत राहिली असली, तरी यावेळी मात्र कामगार विकास पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत संपूर्ण युनियनवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
कामगार युनियनचे प्रमुख पांडुरंग कचरे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली शिट्टी या निवडणूक चिन्हावर अधिकृत उमेदवार उभे करण्यात आले होते. या पॅनलमधील सर्व उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी झाल्यामुळे बारामती शहरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार तसेच आमदार रोहित पवार यांचे विशेष लक्ष असलेल्या सायबर डायनामिक्स युनियनमध्ये, भाजपप्रणीत आणि पांडुरंग कचरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने संपूर्ण सत्ता मिळविल्याने हा विजय बारामतीत चर्चेचा विषय ठरला आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष काल संपूर्ण बारामती शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
अध्यक्ष: विजय महादेव सस्ते
उपाध्यक्ष: मयूर मिनिनाथ शिंदे
कार्याध्यक्ष: गणेश शंकर सोनवणे
सरचिटणीस: राजेंद्र तुकाराम कोळेकर
सह-चिटणीस: दादाराम मंजाबापू पोदकुले
सह-चिटणीस: गोकुळ वाल्मिक मदने
कोषाध्यक्ष: राजेंद्र भानुदास तरंगे
सह-कोषाध्यक्ष: अनिल भालेराव पवार.
सर्व पदाधिकारी बहुमताने विजयी झाल्यामुळे युनियनवर कामगार विकास पॅनलची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे.
या पदावर वरील उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले.
युनियन चे अध्यक्ष विजय सस्ते व सर्व उमेदवार यांनी कामगारांचे आभार व्यक्त केले.
अनेक अडचणीवर मात करून कामगारांनी या पॅनल वर जो विश्वास व्यक्त केला आहे त्यास कोणताही तडा जाऊ दिला जाणार नाही.
भयमुक्त वातारणात विकासाचा नवा अध्याय सुरू करून कंपनी व कामगारांचे हित साध्य करणे साठी सर्वांचे सहकार्याने काम करू कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही निवडून आलेले उमेदवार कामगारांना दैवत म्हणून काम करतील आपला परका न मानता सर्व कामगारांना बरोबर काम करतील
सर्व कामगार बंधू यांनी अत्यंत मोठी जबाबदारी दिली आहे पूर्ण क्षमतेने पार पाडू असे श्री पांडुरंग कचरे यांनी सर्वांना आश्र्वासित केले.






