केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात 1 हजार कोटींचा निधी
सोबतच 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान विशेष सप्ताहाचं आयोजनही करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात 1 हजार कोटींचा निधी
सोबतच 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान विशेष सप्ताहाचं आयोजनही करण्यात आलं आहे.
पुणे :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातात. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात 1 हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. सोबतच 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान विशेष सप्ताहाचं आयोजनही करण्यात आलं आहे. यादरम्यान गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केलं आहे.
काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना?
गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जाते. यामागे जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे हा हेतू आहे. सोबतच मातामृत्यू आणि बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा या उद्देशानेही प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जाते. महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
1 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान विशेष सप्ताह
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने दिनांक 1 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान सर्व पात्र लाभार्थींनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्त्या, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे लाभार्थी आणि तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक, पोस्ट खाते, माताबाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
101 टक्के लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पुणे विभागातील पुणे जिल्हयात 89 कोटी 48 लाख 59 हजार रुपये, सातारा जिल्हयात 37 कोटी 14 लाख 42 हजार रुपये तर सोलापूर जिल्हयात 39 कोटी 62 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. 2021-22 या वर्षासाठी लाभार्थी नोंदणीचे पुणे जिल्हयासाठी 2 लाख 6 हजार 420 इतक्या उद्दिष्टापैकी 2 लाख 8 हजार 166 म्हणजे 101 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली आहे.