केंद्र सरकारने वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत वैध, जाणून घ्या…
संपूर्ण देशात MORTH वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.
केंद्र सरकारने वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत वैध, जाणून घ्या…
संपूर्ण देशात MORTH वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.
नवी दिल्ली : बारामती वार्तापत्र
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि परमिट म्हणजेच वाहन परवाना यांसारख्या वाहनांशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची वैधता कोरोना महामारीमुळे 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध केलीय. MORTH नुसार, ही वैधता फक्त त्या वाहनांवर लागू होईल, ज्यांच्या कागदपत्रांची मुदत 21 फेब्रुवारी 2020 नंतर संपली आहे. त्याच वेळी, MORTH ने सर्व राज्य सरकार आणि RTO कार्यालयांना यासंदर्भात सूचित केलेय. मोर्थच्या या निर्णयाचा तुमच्यावर किती परिणाम होईल हेसुद्धा जाणून घ्या.
दिल्लीत 30 नोव्हेंबरपर्यंत दिलासा मिळेल
कोरोना महामारीमुळे केजरीवाल सरकारने राज्यातील वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. तर संपूर्ण देशात MORTH वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे. केजरीवाल सरकारने हा निर्णय दिल्लीतील लोकांची सोय लक्षात घेऊन घेतला.
मुदत यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आली
मुदत यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आली. यापूर्वी वैधता 30 मार्च 2020 रोजी वाढवण्यात आली होती. त्यानंतर जून 2020 मध्ये पुन्हा मुदत वाढवण्यात आली. त्यानंतर मुदत 24 ऑगस्टला वाढवण्यात आली आणि तीच मुदत डिसेंबर 2020 आणि मार्च 2021, जून 2021 आणि आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवून नवीन तारीख जाहीर करण्यात आली. जिथे केंद्र सरकारने वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. त्याचबरोबर दिल्ली सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली. अशा परिस्थितीत आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र आणि परमिटचे नूतनीकरण करण्यासाठी बराच वेळ आहे.