बावडा गावच्या विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेसाठी रु. २ कोटींचा निधी – अंकिता पाटील ठाकरे
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मंजुरी

बावडा गावच्या विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेसाठी रु. २ कोटींचा निधी – अंकिता पाटील ठाकरे
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मंजुरी
इंदापूर : प्रतिनिधी
बावडा गावच्या विस्तारित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ३ लाख ७७ हजार रुपयांच्या निधीस जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने शुक्रवारी (दि.४) प्रशासकीय मंजुरी दिली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली.
माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सदरची विस्तारित नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे बारावा फाटा -अरगडे वस्ती- घोगरेवस्ती- रत्नप्रभादेवीनगर येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे, अशी माहिती अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली. बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला जात असून विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. यावेळी बावडा गावचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे उपस्थित होते.