दौंड

केडगाव गावच्या हद्दीत सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु

केडगाव गावच्या हद्दीत सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु

यवत; बारामती वार्तापत्र 

दौंड तालुक्यातील केडगाव गावच्या हद्दीत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकच्या झालेल्या अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत नागनाथ हनुमंत गायकवाड (वय २५) रा. देशमुख बोरगाव ता. अक्कलकोट जि. सोलापूर या ट्रकचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक कृष्णा विश्वंभर पवार रा. नाई चाकूर, ता.उमरगा जि. उस्मानाबाद हे अशोक लेलँड क्रमांक MH 25 AJ 4494 हे सोलापुर-पुणे महामार्गाने घेऊन जात असताना केडगाव गावच्या हद्दीत यांनी अचानक आपला ट्रक अचानक थांबवला त्यावेळी पाठीमागून येणारे गायकवाड यांचा ट्रक क्रमांक MH12 RN1196 याची पुढे असलेल्या ट्रकला जोरात धडक बसली त्या घटनेत ट्रक चालक नागनाथ गायकवाड हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान गायकवाड यांना यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील तपासणीसाठी नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी पूर्वी नागनाथ गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेप्रकरणी अर्जुन देविदास गायकवाड रा. खडकवासला तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ पत्ता- देशमुख बोरगाव ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार ट्रक चालक कृष्णा पवार यांच्याविरोधात अपघात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास यवत पोलीस करत आहेत

Related Articles

Back to top button