कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान च्या आवाहनाला निमगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; अतिवृष्टीग्रस्तांना लाखो रुपयांच्या साहित्याची मदत
ॲड.सचिन राऊत यांनी घेतला पुढाकार

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान च्या आवाहनाला निमगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; अतिवृष्टीग्रस्तांना लाखो रुपयांच्या साहित्याची मदत
ॲड.सचिन राऊत यांनी घेतला पुढाकार
इंदापूर : प्रतिनिधी
कोकणात अतिवृष्टी जन्य पावसामुळे अक्षरशः थैमान घातले, गावच्या गावे पाण्याने वेढली गेली आणि अनेकांचे प्रपंच उघड्यावर पडले आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले.त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला निमगाव केतकीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाखोंची मदत केली आहे.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानकडून कोकणाला देऊयात मदतीचा हात या टॅगलाईन खाली आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार निमगाव केतकी येथील अँड.सचिन राऊत यांच्या नेतृत्वाखाली व पुढाकाराने बेडशीट,टॉवेल,बिस्कीट,फरसाणा, पाणी याच बरोबर उबदारकपडे यासह लाखो रुपयांच्या जीवनावश्यक विविध वस्तू निमगावकरांनी सामाजिक बांधिलकी यानात्याने देऊ केल्या.
यावेळी बोलताना ॲड.सचिन राऊत म्हणाले की,कोकण परिसरामध्ये निसर्गाने जो कोप केला आहे,त्यामुळे खूपच बिकट अवस्था झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अन्न, वस्त्र अशा वस्तू मिळत नाहीत.त्यामुळे कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानकडून कोकणाला देऊयात मदतीला हात अशा प्रकारे जे आवाहन केले होते.त्याला निमगावकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून जीवनावश्यक वस्तुंच्या स्वरूपात फुल नाही फुलाची पाखळी स्वरूपात निमगावकरांनी मदतीचा हात देऊ केला आहे.निसर्गाने प्रकोप केल्याने माणूस या नात्याने माणुसकी दाखवणे गरज आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपला भाऊ-बहीण किंवा आपल्या परिवारातील कोणी आहे या भावनेतून मदत करायची असून ज्याला कोणाला मदत करायची असेल त्यांनी संपर्क करावा सर्व वस्तू पूरग्रस्तांना पोहचवण्याचे काम आम्ही करणार आहोत असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.