कै.विठोबा भरणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरणे कुटुंबाचे केले सांत्वन
कै.विठोबा भरणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरणे कुटुंबाचे केले सांत्वन
बारामती वार्तापत्र
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे (वय ९२)यांच्या पार्थिवावर बुधवार (ता.३० डिसेंबर) रोजी दुपारी १२:२५ वाजण्याच्या सुमारास अत्यंत शोकाकूल वातावरणात भरणेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्षाच्या नेतेमंडळींच्यासह इंदापूर तालुक्याबरोबरच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी साश्रुपूर्ण नयनांनी कै. विठोबा (तात्या) भरणे यांना अखेरचा निरोप दिला. अंथुरने, जंक्शन परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कै.विठोबा ( तात्या ) भरणेंना आदरांजली व्यक्त केली.
यावेळी आमदार राहुल कूल,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,प्रदीप गारटकर,प्रशांत काटे, दिगंबर दुर्गाडे,माजी आमदार रमेश आप्पा थोरात,संतोष पवार,दशरथ माने,माजी विधान परिषद सदस्य आर.जी रुपनवर,माजी आमदार नारायण पाटील,
प्रवीण माने,राजवर्धन पाटील, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यापैकी बोलताना प्रमुख मान्यवरांनी कै. विठोबा (तात्या) भरणे यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरणेवाडी येथील निवासस्थानी येऊन कुटुंबाचे सांत्वन केले.