कोरोंना विशेष

कॉल करताना ‘कोरोना’ व्हायरसची कॉलर ट्यून ऐकून तुम्ही देखील झालात परेशान, ‘या’ पध्दतीनं होईल सूटका

कोरोना विषाणूच्या कॉलर ट्यूनला कसे बंद करावे

कॉल करताना ‘कोरोना’ व्हायरसची कॉलर ट्यून ऐकून तुम्ही देखील झालात परेशान, ‘या’ पध्दतीनं होईल सूटका

कोरोना विषाणूच्या कॉलर ट्यूनला कसे बंद करावे

बारामती वार्तापत्र

कोरोना विषाणूचे संक्रमण भारतासह संपूर्ण जगभर पसरत आहे. एकीकडे सरकारचे विविध विभाग आपल्या परीने लोकांना या आजाराची जाणीव करुन देण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या मोठ्या दूरसंचार कंपन्यांनी लोकांना जागरूक करण्यासाठी कोरोना विषाणूची हॅलोट्यून स्थापित केली आहे.
जर आपणसुद्धा कोरोनाची कॉलर ट्यून ऐकून अस्वस्थ झाला असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत की ही ट्यून ऐकणे कसे टाळावे. येथे आम्ही आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगत आहोत ज्यानंतर आपल्याला ही ट्यून ऐकू येणार नाही.

कोरोना विषाणूच्या कॉलर ट्यूनला कसे बंद करावे
– या ट्यूनपासून सुटका करण्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीला कॉल करा ज्याच्याशी आपल्याला बोलायचे आहे.
– आता त्या कोरोना व्हायरस मॅसेज अलर्टच्या वाजण्याची प्रतीक्षा करा जी नंबरवर सेट आहे.
– मॅसेज सुरू होताच आपल्या Keypad वर 1 दाबा.
– आपण 1 दाबताच समोरून ऐकू येणारा मॅसेज बंद होईल आणि पूर्वीप्रमाणे रिंग ऐकू येण्यास सुरवात होईल.
– काही स्मार्टफोनमध्ये हे # दाबून देखील बंद होत आहे.
ही ट्रिक कंपनीकडून सांगण्यात आलेली नसून काही वापरकर्त्यांनी स्वतः अवलंब केल्यामुळे हे समोर आले आहे. तथापि, हे आवश्यक नाही की ही ट्रिक आपल्या स्मार्टफोनच्या ब्रँड किंवा सेवा प्रदात्यानुसार कधी काम करणार नाही. जर एकदा क्लिक केल्यावर आपल्याला रिंग ऐकू येत नसेल तर पुन्हा प्रयत्न करा कदाचित आपले काम होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram