इंदापूर

कोकाटेंच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली; खा. सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका….

कोकाटेंच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली; खा. सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका….

कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता….

खासदार सुप्रिया सुळे यांचा माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा……

सरकारने हद्द केली म्हणत सुप्रिया सुळेंची राज्य सरकार वरती टीका….

इंदापूर;प्रतिनिधि

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या रमी गेम खेळण्यावरून राज्य सरकार वरती टीका केली आहे. इंदापूर मधील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर माणिकराव कोकाटे प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

जो माणूस मंत्रालयात मोबाईल वरती गेम खेळत होता एकतर तो पकडला गेला त्याला आम्ही जबाबदार नाही. तुम्ही बसला होता त्याच्या पाठीमागच्याच माणसाने व्हिडिओ काढला याचा अर्थ व्हिडिओ तुमच्याच विचाराच्या माणसाने काढलाय.समोरच्या लोकांनी तर व्हिडिओ काढला नाही पण बिचार्‍या रोहितला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. अहो व्हिडिओ आम्ही नाही काढला मागे बसणारा ने काढला आमचा काय संबंध आम्ही फक्त ट्विटरवर टाकला असं सुळे यांनी म्हटलं आहे.

गंमत अशी झाली की दत्तात्रय भरणे यांना शेती खात गेलं आणि कोकाटे यांना क्रीडा खाते मिळालं. पण आता खेळ करताना आम्ही केंद्रामध्ये कायदा पास केला.ज्या गेम वर पैसे लावले जातात ते ऑनलाईन सर्व खेळ या देशात बंद केले आहेत. केंद्र ज्यावेळेस कायदा करते त्यावेळी ते प्रत्येक राज्यासाठी करतं राज्य सरकारने त्याचे नियम करावे लागतात मात्र आता महाराष्ट्रात नियम करताना क्रीडा मंत्री कोण ? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी हातामध्ये पत्ते खेळण्याची नक्कल करत या कायद्याच्या नियम कोण करणार ? आश्चर्य व्यक्त केलंय.

मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र लिहिणार आहे की ज्या मंत्र्याला तुम्हाला बदलावं लागलं का तर तो कामावर बसलेला असताना मोबाईलवर गेम खेळत होता, त्याला केंद्र सरकारने बंदी आणली आहे त्या बंदी वर नियम कायदे बनवायला तोच मंत्री तुम्ही बसवलाय. जो मुलगा वर्गात कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता. आता या सरकारने हद्द केली म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार वरती टीका केली आहे.

Related Articles

Back to top button