कोरोंना विशेषशैक्षणिक

कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सज्ज

कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे व वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलसुंदर व डॉ. विधाते यांच्या प्रयत्नांतून कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून सज्ज केले आहे.
.
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एक मातेचे कोरोनामुळे व शिंगणापूरमध्ये एक मातेचे सारीमुळे निधन झाले असून प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यासाठी ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, दमा व श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा रुग्णांना भरती करून उपचार करण्यासाठी हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी खाजगी व सरकारी डॉक्टर या रुग्णांवर उपचार करणार आहेत. वरिष्ठ स्तरावरून परवानगी मिळताच हे सेंटर लवकरच सुरू करण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram