कोरानाचे 13 दिवसात तेरा रुग्णांचा मृत्यू, बारामती तालुक्यातील चार तर इतर तालुक्यातील नऊ रुग्णांचा समावेश ,काळजी घ्या
काल देखील बारामती तालुक्यातील एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

कोरानाचे 13 दिवसात तेरा रुग्णांचा मृत्यू, बारामती तालुक्यातील चार तर इतर तालुक्यातील नऊ रुग्णांचा समावेश ,काळजी घ्या
काल देखील बारामती तालुक्यातील एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
बारामती वार्तापत्र
मागील चार महिन्यात कोरोनाचे प्रमाणही कमी झाले होते आणि कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही जवळपास शून्यावर आली होती, मात्र मार्च महिन्याची जशी सुरुवात झाली, तसे कोरोनाचे रूग्ण आणि पुन्हा मृत्यूचे तांडव उभे केले आहे. गेल्या 13 दिवसात बारामतीतील विविध दवाखान्यांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे कोरोना अगदी सहज गतीने घेण्यासारखा नाही. आजही घेण्यासारखा नाही. याची जाणीव होण्याची गरज आहे. दररोज बारामतीमध्ये आढळणार्या मोठ्या रूग्ण संख्येचा विचार करता ज्यावेळी दवाखाने पुन्हा एकदा पूर्ण भरून जातील, तेव्हा मात्र उपचारासाठी मागील वर्षात सारखीच अवस्था येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मार्च पासून बारामती मध्ये बारामती, इंदापूर, फलटण, कर्जत, दौंड आणि पुरंदर या तालुक्यातील रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र त्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने चिंता करण्यासारखी बाब आहे.
यातही एक मार्चपासून दररोज सरासरी एका जणाचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 6 मार्च रोजी बारामतीतील दवाखान्यांमध्ये उपचार घेत असलेल्या 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर 12 मार्च रोजी 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. काल देखील बारामती तालुक्यातील एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील रुग्णांपैकी काही बारामतीतील तर काही बारामतीच्या बाहेरील तालुक्यातील आहेत, मात्र कोरोनाने पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव सुरू केले आहे, एवढेच संकेत यातून मिळण्यास पुरेसे आहेत.