मुंबई

कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता.

कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता.

मुंबई :प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आता शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. बजावण्यात आलेल्या समन्सनुसार शरद पवार येत्या 23 फेब्रुवारीला आपली साक्षा नोंदवणार आहेत. त्यांना 23 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधिक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे. आता या सर्वांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान पोलिसांनी एकूण 162 जणांवर गुन्हे दाखल केले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळं भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग नेमला आहे. या चौकशी आयोगाकडून साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार यांना समन्स पाठवण्यात आला आहे.

पवार यांची साक्ष नोंदवण्याची मागणी

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळेच भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळल्याचा आरोप त्यावेळी शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर पवार यांची देखील साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी अॅड प्रदीप गावडे यांनी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे. यापूर्वी रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग यांना देखील साक्ष नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram