महागाईचा भडका सुरुच! पेट्रोल डिझेल स्थिर, पण आता सीएनजी दरवाढीचा धक्का

शनिवारी IGL च्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहिती

महागाईचा भडका सुरुच! पेट्रोल डिझेल स्थिर, पण आता सीएनजी दरवाढीचा धक्का

शनिवारी IGL च्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहिती

प्रतिनिधी

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र सीएनजीच्या वाहनांना पुरवठादार कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने मोठा धक्का दिला आहे. शनिवारी IGL च्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, CNG च्या किमती बदलण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता लोकांना सीएनजीसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

नवीन दर काय असतील?
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने काही राज्यात सीएनजीच्या किमती वाढवल्या आहेत. 4 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीत एक किलो सीएनजीसाठी 53.04 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये एक किलो सीएनजीसाठी 60.40 रुपये मोजावे लागतील. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, शनिवारपासून कर्नालमध्ये 1 किलो सीएनजीसाठी 61.10 रुपये मोजावे लागतील. पुण्यात ६३. ९ प्रती किलो असे दर आहेत.

जाणून घ्या दर काय आहेत?
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद – 58.58 रुपये प्रति किलो
मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली – 63.28 रुपये प्रति किलो
गुरुग्राम – ६०.४० रुपये प्रति किलो
रेवाडी – 61.10 रुपये प्रति किलो
कर्नाल आणि कैथल – 59.30 रुपये प्रति किलो
कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूर – 67.82 रुपये प्रति किलो
अजमेर, पाली आणि राजसमंद – 67.31 रुपये प्रति किलो

15 नोव्हेंबरला किती दर होता?
दिल्लीत एक किलो सीएनजीसाठी ५२.०४ रुपये मोजावे लागत होते.
ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद 58.58 रुपये प्रति किलो

Check Also
Close
Back to top button