आमराईतील त्या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; कोरोनाचा सहावा बळी
बारामती शहरातील आमराई येथील ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बारामती शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, बारामती तालुक्यातील कोरोना बळींची संख्या आज सहावर गेली आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली.
बारामती शहरातील आमराई येथील एका महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी या महिलेला बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालपासून हे रुग्णालय शासनाने ताब्यात घेतले असून आज सकाळी या महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बारामती शहर आणि तालुक्यात पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज सहावा बळी गेला आहे.